Published On : Thu, Jul 8th, 2021

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात मुसळधार पावसात काँग्रेस ची सायकल रॅली..!!

महागाईने मोडले सर्वसामान्य जनतेचे कंबरडे..!!

2014 साली सध्या केंद्रात असलेल्या भाजपच्या सरकारने देशात महागाई च्या विरोधात तीव्र आंदोलन केले व महागाई या मुद्यावर निवडणूका जिंकून सत्ता प्राप्त केली. मात्र सत्तेत येताच 410 रुपये किंमत असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस ची किंमत दुपटीने वाढवली 60 रुपये लिटर पेट्रोल ची किंमत आज घडीला 106 रुपये झालेली आहे तर इतर विविध वस्तूंची किंमत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे..!!

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने मा.श्री. नाना पटोले, (अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी मा.ना.श्री. सुनील केदार, (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवककल्याण), मा.श्री. चंद्रकांत हांडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष, मा.श्री. नाना गावंडे, (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), मा.श्री.राजेंद्र मुळक, (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) व मा.आ.श्री. विकास ठाकरे, (अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी नागपूर), मा.आ.श्री. राजू पारवे, मा.आ.श्री. अभिजीत वंजारी, मा.श्री. अनिस अहमद (माजी मंत्री), मा.श्री. एस. क्यु. जामा (माजी आमदार), मा.श्री. अतुल लोंढे (प्रवक्ता), मा.श्री. सुरेश भोयर, मा.श्री. हुकूमचंद आमधरे, मा.श्री. संजय मेश्राम, मा.श्री. गंगाधर रेवतकर यांची उपस्थिती होती. मुसळधार पावसातही शेकडो कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

या रॅलीत प्रत्येक सायकल वर केंद्राने कश्या पद्धतीने दरवाढ केली या बद्दल ची माहिती बॅनर च्या माध्यमातून लावली होती. तर केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेचा विचार न करता केवळ आपले मंत्रिमंडळ वाढविण्याच्या व विविध राज्यात गेलेली सत्ता मिळविण्याचा प्रयत्नात आहे तर जो सरकारच्या विरोधात बोलेल त्यामागे सीआयडी,ईडी लावण्याचा कामात व्यस्त असल्याने महागाई कडे दुर्लक्ष करत आहे…!!

मात्र नागपूर काँग्रेस कमिटी या असल्या प्रकारच्या कोणत्याही संस्थेला न घाबरता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन यापुढे ही अविरत चालू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले..!!!