Published On : Sat, Jun 19th, 2021

राज्य केंद्रीय राखीव पोलिस दल हिंगणा ग्रुप सेंटरचे कार्य अभिनंदनीय

Advertisement

– केंद्रीय सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरी

नागपूर : सीआरपीएफ ग्रुप सेंटर हिंगणा येथे चांगल्या प्रकारे वृक्षारोपण केल्याने आणि जलसंवर्धनाचे कार्य सुद्धा चांगले झाले असल्याने आणि सीआरपीएफ 45 हजार वृक्षारोपणाचा संकल्प करत असल्या बद्दल केंद्रीय रस्ते , महामार्ग आणि केंद्रीय सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरींनी नागपूरच्या हिगणा येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटरचे अभिनंदन केल आहे . केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्प परिसरात आयोजित शहीद हिंगोले गंगाराम किशन कॉपरेटीव्ह शॉपचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . यावेळी केंद्रीय राज्य राखीव पोलिस दलाचे महा पोलीस निरीक्षक जांभुळकर, हिंगणा क्षेत्राचे आमदार समीर मेघे , महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते

महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये सीआरपीएफचे जवान सदैव तहान भूक विसरून तैनात असतात त्यांच्या कर्तव्य निष्ठेचे आपण कौतुक करतो असे गडकरी यांनी यावेळी सांगितले .टोल नाक्यांमध्ये सीआरपीएफच्या जवानांना सुद्धा सवलत मिळावी याकरिता आपण प्रयत्न करू असेही गडकरी यांनी आश्वासन दिले. याप्रसंगी गडकरी यांनी जनरल कॅप्टन इंगोले को-ऑपरेटिव स्टॉलला भेट दिली जवानांनी गडकरींना मानवंदना दिली.

ग्रीन नागपुर -हरित नागपूरचे स्वप्न साकार करण्यासाठी नागपूरला जल वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून दूर ठेवण्याची गरज आहे.सीएनजी संचालित तसेच इथेनॉल मिश्रित इंधनामुळे नागपूरचे वायुप्रदूषण कमी होईल असेही त्यांनी सांगितले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ग्रुप सेंटरच्या परिसरात पेयजलाची लाईन टाकल्याने शुद्ध पेयजलाची सुद्धा सोय झाली आहे. या परिसरातील असणाऱ्या परिसंस्था आणि जलसंवर्धनाचे कार्य करण्यासाठी तामसवाडा पॅटर्नच्या धर्तीवर मार्गदर्शन आपल्या संस्थेद्वारे केला जाईल असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिलं.

या को-ऑपरेटिव स्टोअर च्या बाजूलाच एक औषधी चे दुकान सुद्धा टाकावे ज्यामुळे जवानांना स्वस्तात औषधी औषधी मिळतील अशी सूचना गडकरींनी केली . सी आर पी एफ गेट ते शिवनगाव इसासनी पर्यंत 25 कोटी रुपयांच्या तरतुदीने सिमेंट काँक्रीट रोडची मंजुरी सुद्धा मिळाली असल्याचे गडकरी यांनी यावेळी जाहीर केलं.

गडकरींनी परिसरात वृक्षारोपणही केले आणि प्रशिक्षणार्थी जवानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात ग्रुप सेंटरमधील प्रशिक्षणार्थी जवान ,अधिकारी उपस्थित होते.