Published On : Sat, Jun 19th, 2021

आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्राचे संस्थापक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांचे स्वयंस्फूर्तीने लसीकरण

मुस्लीम बांधवांनी लस घेण्याचे केले आवाहन

नागपूर : आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्र, माहिती व मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक, मुस्लीम समाजातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांनी कामठी रोड येथील आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्रात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोज घेतला.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुस्लीम समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांनी त्वरित कोव्हिड प्रतिबंधात्मक लस घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोव्हिड लसीकरण हा कोरोनामुक्तीचा एकमेव मार्ग असून समाजात याबाबत काही असामाजिक तत्व अंधश्रद्धा पसरवित असल्याने अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, स्वत:ची तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी. शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. काही दिवसांपूर्वी मौलाना सैय्यद आलमगीर अशरफ यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने मुस्लीम समाजातील काही प्रतिष्ठित, नेतृत्व करणाऱ्या नागरिकांची सभा घेऊन लसीकरणाचे फायदे समजावून सांगितले होते.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., लसीकरण मोहिमेचे मार्गदर्शक अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्या नियोजनात झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहेमान खान, आशीनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय पथकातील डॉ. हिना कुरेशी यांनी लसीकरण केले. हाजी अयूब अंसारी, जलील अंसारी, मौलाना जफर, ऐहसान कादरी, हाफीज अख्तर आलम अशरफी, वजहुल अशरफी, अश्विन बोदोले यांनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement