Published On : Thu, Jul 25th, 2019

नेत्र तपासणी व दंत चिकीत्सा शिबिर कार्यक्रम संपन्न

नागपूर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र, बुटिबोरी येथे दिनांक २३/७/१९ रोज मंगळवारला नेत्र तपासणी व दंत चिकीत्सा शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.

त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन समाजसेवी पंकज ठाकरे संस्थापक अध्यक्ष, कर्मयोगी फाऊंडेशन, प्रमुख पाहुणे म्हणून शरद कबाडे, सुनील विश्वकर्मा,शिवाजी बारेवार व कॉंटा केयर हॉस्पिटल चे साहिल सिंग,डॉ अमोल आमधरे, अँडव्हांस डेंटल हॉस्पिटल ची टीम इत्यादी उपस्थित होते .

नेत्र तपासणी शिबिर मध्ये १२० कामगार व कुटुंबीयांनी आपले डोळे व दाता ची तपासनी करून घेतली . भविष्यात आशा प्रकारचें अनेक समाजप्रयोगी उपक्रम भविष्यात कामगार कल्याण केंद्र बुटीबोरी येथे राबविण्यात येथील असे केंद्रप्रमुख सुधर्मा खोडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन व संचालन केंद्र संचालक सुधर्मा खोडे व आभार नंदा खराबे यांनी केले कार्यक्रमा मध्ये परिसरातील कामगार बंधु व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता किरण भद्रे व “कर्मयोगी फाऊंडेशनच्या” कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.