Published On : Thu, Jul 25th, 2019

महा मेट्रो : रिच-३ (सिताबर्डी ते लोकमान्य नगर) पर्यंत (ट्रॅक) रूळाचे कार्य पूर्ण

सिताबर्डी ते लोकमान्य नगर दरम्यान लवकरच मेट्रो सेवा सुरु होणार

नागपूर : शहरात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गिकांवर मेट्रो प्रकल्पाचे वेगाने कार्य पूर्ण होत आहे. ज्याप्रमाणे वर्धा मार्गावरिल रिच-१ मेट्रो सेवा सुरु झाली असून हिंगणा मार्गावरील (रिच-३) येथे लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.

याच अनुषंगाने महा मेट्रो द्वारे या भागात कार्य जलद गतीने सुरु असून आज महत्वाचा पल्ला नागपूर मेट्रोने गाठला अवध्या १४ महिन्याच्या कालावधी मध्ये या रिच मधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे.जो की एक महत्वाचा उच्चांक आहे. या सोबतच ओएचई केबलचे कार्य अंतिम टप्प्यात असून लवकरच या ठिकाणी विद्युत लाईन चार्ज केल्या जाईल. सदर ओएचई विद्युत केबल मुळे मेट्रो ट्रेन चालण्यास मदत होते.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पामध्ये १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रेल वापरण्यात आले आहे. १०८० ग्रेडचे हेड हार्डनड रूळ अत्याधुनिक पद्धतीने बनविल्या जाते ज्यामध्ये रुळाच्या हेड ; म्हणजेच (वरील भागावर) बळकट बनविण्याकरिता विशेष लक्ष दिल्या जाते, जेणे करून रुळाचे आयुष्य जास्त असते व देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी होतो.

आरडीएसओने RDSO (अनुसंधान अभिकल्प आणि मानक संगठन) ने मेट्रोच्या कामासाठी ६० किलो १०८० एचएच रूळ चा वापर करणे अनिवार्य केले आहे, जे की भारतातील सर्व मेट्रोमध्ये वापरण्यात आले आहे. रुळाचे हेड हे हार्ड म्हणजेच कडक असते जे की रेल्वेच्या चाकांना आधार देते व स्थिरता प्रदान करते. एक किलोमीटरच्या ट्रॅक निर्माण करण्याकरिता १२० टनच्या रेलची आवश्यकता असते.

इतर मेट्रोमध्ये रुळची लांबी १८ मी आहे तथापि नागपूर मेट्रो ही पहिली मेट्रो आहे जिथे २५ मी. लांबीचे रुळ वापरण्यात आले आहे. नागपूर मेट्रो ने रशिया वरून या रूळाची आयात केली आहे.

सदर रूळ एवराज “EVRAZ” कंपनीच्या वेस्ट साईबिरीयन मेटलर्जीकल कारखान्या मध्ये तयार केल्या गेले असून हा “रशियातील सर्वात मोठा रूळ बनविणारा कारखाना आहे. “EVRAZ” ही कंपनी जागतिक स्तराच्या अव्वल २० उत्पादका मध्ये एक आहे.

या रुळाचे उत्पादन झाल्यावर रुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी ध्वनीलहरी चाचणी, प्रोफाईल मापन, विधूत तपासणी, अल्ट्रासॉंनीक चाचणी, बार कोडिंग इत्यादी प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहे. नागपूर मेट्रोने रूळाच्या चाचणी आणि निरीक्षणाकरीता जगातील सर्वोत्कृष्ट “चाचणी आणि ऑडिटींग एजन्सी मेसर्स एसजीएस वोस्तोंक” ला नियुक्त केले आहे.