खापड़खेड़ा – सावनेर पंचायत समितीचे सदस्य राहूल तिवारी यांच्या संकल्पनेतून चनकापूर मैदानात दिनांक ११ फेब्रुवारी बुधवारला दुपारी ४ वाजता करिअर मार्गदर्शन शिबीर पार पडले यावेळी ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, खंडविकास अधिकारी अनिल नागने आवर्जून उपस्थित होते याप्रसंगी प्रामुख्याने सिल्लेवाडा कोळसा खाणचे सर्व अधिकारी यांच्यासह जि.प.प्रकाश खापरे, सावनेर पंचायत समिती सभापती अरुणाताई शिंदे, पोटा-चनकापूर ग्रामपंचायत चे नवनियुक्त सरपंच पवन धुर्वे, उपसरपंच विश्वजित सिंग, गटशिक्षण अधिकारी अनिल भाकरे, फिनिक्स एकेडमीचे संचालक प्रदीप कमाले, पत्रकार सुनील जालंदर आदि मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी रस्सीखेच स्पर्धेतील राज्य स्तरीय खेळाडू कु. अर्पिता सुनील जालंदर हिने नागपूर जिल्हा ग्रामिण पोलीस अधिक्षक मा.श्री राकेश ओला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कुमारी अर्पिता सुनील जालंदर हि कोराडी येथील फिनिक्स एकेडमी येथे शिक्षण घेत असून ती प्रदीप कमाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्पर्धेची तयारी करीत आहे येणाऱ्या काळात तिची ग्रामिण पोलीस दलात नियुक्ती अपेक्षित आहे.
पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी यांनी परिसरातील तरुण तरूणीना त्यांच्या भविष्यात करिअर घडविण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खापरखेडा पत्रकार संघ त्यांचे आभारी आहे.
Attachments area