Published On : Wed, Jun 20th, 2018

दाखले वाटप शिबीर देवलापार यशस्वीपणे पार पडले…

रामटेक: दि.१९ जून २०१८ रोजी मा. जिल्हाधिकारी श्रि आश्विन मुदगल यांच्या आदेशान्वये व मा, उपविभागीय अधिकारी श्री राम जोशी यांच्या मार्गदर्शनात दाखले वाटप शिबीर स्वामी विवेकानंद प्रशाला देवलापार येथे आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री निघोट मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद प्रशाला यांच्या हस्ते करण्यात आले. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा नागरीक व विद्यार्थ्यांनी आधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन नायब तहसिलदार देवलापार श्री चोबे यांनी केली.

शिबीरात ८२ उत्पन्न प्रमाणपत्र, २७ वय अधिवास व राष्ट्रियत्व प्रमाणपत्र,२२ रेशन कार्ड दुरुस्ती, १२० सात बारा, २४ फेरफार उतारे इ. देण्यात आले. ६४ आधार कार्ड काढणे व दुरुस्ती करण्यात आले.

उपस्थितांना मा. तहसिलदार रामटेक श्री धर्मेश फुसाटे, जि.प. सदस्य श्रीम कुमरे व पंचायत समिती सदस्य श्रीम. सरोदे यांचे हस्ते दाखले वाटप करण्यात आले. सदर शिबीरावेळी नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर होता.