Published On : Wed, May 2nd, 2018

रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा : अभय गोटेकर

Advertisement

Abhay Gotekar

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने झोपडपट्टीधारकांना घरे देणाऱ्या रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

बुधवारी (ता.२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरे बांधणी विशेष समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, समिती उपसभापती उषा पॅलट, सदस्य स्नेहा निकोसे, परसराम मानवटकर, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभुळकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, स्थावर अधिकारी आर.एस.भुते प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी सभापती गोटेकर यांनी शहरातील घोषित व अघोषित असलेल्या झोपडपट्ट्यांचा आढावा घेतला. नागपूर शहरात ३९३ घोषित व १३१ अघोषित झोपडपट्ट्या असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जांभुळकर यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाद्वारे येणाऱ्या अनुदानाची माहिती कार्यकारी अभियंता राजेश रहाटे यांनी दिली. रमाई घरकुल योजनेच्या कार्यवाहीचा आढावा यावेळी सभापतींनी घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती कार्यकारी अभियंता संजय रहाटे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमविकास योजनेची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किंवा मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना २६९ चौ.फूट जागेचे घर मनपा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Advertisement