Published On : Wed, May 2nd, 2018

खराब कामगिरीमुळे कोल इंडियाच्या वार्षिक क्रमवारीत डब्ल्यूसीएलला ‘नीचांकी स्थान’

WCL

नागपूर: कोल इंडिया लिमिटेडने आपल्या सहायक कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. सदर क्रमवारीमध्ये वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडला (डब्ल्यूसीएल) नीचांकी स्थान मिळाले असून त्यांनी २०१६-१७ या वर्षी अत्यंत खराब कामगिरी केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

ही क्रमवारी कोल इंडिया लिमिटेडच्या १९० व्या बैठकीदरम्यान जाहीर करण्यात आली. यामध्ये वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडला ४१.४० गुणांसह तळाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्या कामगिरीला ‘ठीक’ असे संबोधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘इसीएल’ देखील या क्रमवारीमध्ये माघारले असून ते ५१.३६ गुणांसह डब्ल्यूसीएलच्या केवळ एक पाऊल समोर आहे.

Advertisement

योजना विभाग कोलकाताचे महाव्यवस्थापक मनोज कुमार सिंग यांनी ही यादी ३० एप्रिल २०१८ रोजी जाहीर केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement