Published On : Tue, Sep 28th, 2021

भूमिअधिग्रहणासंबंधी कार्यवाही तातडीने पूर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी

गितांजली चौक ते गांधीसागर तलाव रोडच्या भूमिअधिग्रहणासंदर्भात चर्चा

नागपूर: शहरातील गितांजली चौक ते गांधीसागर तलाव रोडच्या कार्यामध्ये आवश्यक भूमिअधिग्रहणासंदर्भात तातडीने कार्यवाही पूर्ण करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

Advertisement

सदर विषयाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.२८) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., निगम सचिव डॉ. रंजना लाडे, मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, सहायक संचालक नगर रचना हर्षल गेडाम, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, उपजिल्हाधिकारी हेमा बढे आदी उपस्थित होते.

Advertisement

गितांजली चौक ते गांधीसागर तलाव रोड हा नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असून यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. यासंबंधी भूमिअधिग्रहणासंदर्भात काही नागरिकांचे संमतीपत्र आपल्याकडे प्राप्त झाली असल्याची माहिती महापौरांनी दिली.

महापौरांकडे प्राप्त संमतीपत्रांबाबत आवश्यक कार्यवाही करून भूमिअभिलेख कार्यालय आणि मनपाच्या नगर रचना विभागाने समन्वयाने आवश्यक ती संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी. पुढील आठवडाभरात नगर रचना विभागाने प्रमाणीकरण मसुदा सादर करण्याबाबत कार्यवाही करावी. भूमिअधिग्रहणासंदर्भात आवश्यक निधी मनपातर्फे राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे तातडीने यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यापर्यंत याबाबत अंतिम स्वरूप सादर करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधित विभागांना दिले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement