Published On : Fri, Jun 22nd, 2018

रस्ता रूंदीकरणासंदर्भातील प्रशासकीय कामे सात दिवसांत पूर्ण करा

नागपूर: जुना भंडारा रोड आणि केळीबाग रस्ता रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. या प्रस्तावित कामाला गती देण्यासाठी पुढील सात दिवसात रस्ता रूंदीकरणासंदर्भातील सर्व प्रशासकीय कामे पूर्ण करण्याचे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.

शुक्रवारी (ता.२२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात दटके समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, कर व कर आकारणी समिती उपसभापती सुनील अग्रवाल, उपायुक्त नितीन कापडणीस, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
16Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,27,600 /-
Gold 22 KT ₹ 1,18,700 /-
Silver/Kg ₹ 1,80,800/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी भंडारा रोड रूंदीकरण, जुना भंडारा रोड रूंदीकरण, सिवर रोड (मॉडेल मिल चौक ते रामजी पहेलवान चौक) रस्ता रूंदीकरणाबाबत बैठकीत चर्चा झाली. अधिकाऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी आपल्याजवळ अथवा आयुक्तांजवळ समस्या मांडाव्या, अशी सूचना माजी महापौर प्रवीण दटके यांनी केली. ज्या सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्य़ा रस्त्याच्या जंक्शनजवळ असलेला रस्ता जोडण्यात आलेला नाही, तो ताबडतोब जोडण्यात यावा, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले.

Advertisement
Advertisement