Published On : Wed, Dec 18th, 2019

छापिल मतदान याद्या उपलब्ध न केल्यामुळे वरिष्ठ अधिका-याकडे तक्रार

Advertisement

कन्हान : – छापील मतदार यादी न उपलब्ध करून दिल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे व निवडणूक प्रक्रिये मध्ये छापील मतदार यादी उपलब्ध करणे निवडणूक अधिकार्‍याचे काम आहे. येत्या नऊ जानेवारीला कन्हान- पिंपरी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे.

या निवडणुकीची प्रक्रिया हे सुरू झाली आहे निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या दोन दिवस होऊनही छापील मतदान याद्या न देता पेन ड्राइव मध्ये घेऊन जा आणि संगणकावरून काढा असे निवडणूक अधिकारी, निवडणूक कर्मचारी असे सांगत आहेत छापील मतदार यादी उपलब्ध करून देण्याच्या नियम असताना निवडणूक अधिकारी यांनी नियमाला बगल देऊन कार्य करीत आहेत.

Advertisement
Advertisement

याबाबत जिल्हाधिकारी निवडणू क अधिकारी व विभागीय आयुक्त यांना तक्रार करण्यात आली व महाराष्ट्राचे निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली असुन दोषींना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते,भीमशक्ती चे पदाधिकारी चंद्रशेखर भिमटे, कैलास बोरकर, निखिल रामटेके, नितेश मेश्राम, रोहित मानवटकर, रॉबिन निकोसे,नितीन मेश्राम, मनोज शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement