Published On : Sun, May 20th, 2018

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगातर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या वतीने मानव अधिकार विषयावरील चौथ्या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लघुपट पाठविण्याची अंतिम तारीख २ जुलै २०१८ आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी लघुपट पाठविण्याचे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या वतीने मानव अधिकाराचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही भारतीय भाषेतील लघुपट पाठविता येणार असून इंग्रजी उपशिर्षक असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून लघुपट हा कमीत कमी तीन मिनिटे व जास्तीत जास्त १० मिनिटाचा असावा.

Advertisement
Advertisement

इच्छुकांनी आपला प्रवेश अर्ज २ जुलै २०१८ पूर्वी उपसंचालक (माध्यम व संवाद), आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग, मानव अधिकार भवन, सी ब्लॉक, जीपीओ संकुल, नवी दिल्ली-११००२३ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement