Published On : Wed, May 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

एनएमआरडीए हद्दीत मनपाची बस सेवा चालविण्याकरिता ‘फायनान्शियल मॉडेल’ तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा
Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांबाबत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी बुधवारी (ता.27) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी एनएमआरडीए हद्दीत मनपाची बस सेवा चालविण्याकरिता ‘फायनान्शियल मॉडेल’ तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, उपायुक्त श्री. राजेश भगत, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, श्री. अजय पझारे, परिवहन प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे यांच्यासह, ऑपेरेशन व्यवस्थापक श्री राजीव घाटोळे, प्रशासनिक व्यवस्थापक श्री गजानन नागूलवार, एनएमआरडीएचे अधीक्षक अभियंता आणि एमएसआरटीसीचे विभागीय वाहतूक अधिकारी श्रीमती रंजना घोडमारे , महावितरण चे श्री परांजपे , मे. चलो मोबिलिटी प्रा. लि., यांच्यासह इतर ऑपरेटरन प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी परिवहन विभागाविषयक विविध प्रलंबित कामे, एनएमआरडीए हद्दीतील शहर बस सेवा, खापरी डेपो येथील मिहानच्या जागेचे हस्तांतरण, तसेच ‘पीएम ई-बस’ योजनेअंतर्गत खापरी डेपोतील आणि वाठोडा बस डेपो अंतर्गत स्थापत्य विषयक विविध कामांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी एनएमआरडीए हद्दीत 7 मार्गावर मनपाची बस सेवा चालविण्याकरिता एक ‘फायनान्शियल मॉडेल’ तयार करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये बस नेमक्या कोणत्या मार्गांवर धावणार, प्रत्येक बसच्या वाहतुकीवर येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबतची सविस्तर माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन विभागाशी संबंधित विविध विभागाशी संबंधित असलेल्या अडचणी, डेपो, बस ऑपरेटर, कॅफो, राज्य सरकार, महावितरण, एमएसआरटीसीशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न, त्यांचे करण्यात येणारे निराकरण, विकासकामे आणि भविष्यात नवीन काय उपाययोजना करता येतील, या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.