| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 25th, 2018

  हास्य कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध

  महापालिकेद्वारे अखिल भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन

  नागपूर: एक भूत ने दुसरेसे कहा की, आदमीयोसे बचकर रहना चाहिये, यह बढे खतरनाक होते है. अशा भन्नाट व्यंग कवितेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते नागपूर महानगरपालिका प्रभाग क्र.15 यांच्यातर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला अखिल भारतीय हास्य व्यंग कवि संमेलनाचे आयोजन धरमपेठ येथील ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क येथे करण्यात आले.

  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अजय संचेती, आमदार प्रा.अनिल सोले, गिरिश व्यास, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, भाजपाचे माजी संघठनमंत्री अरविंद शहापूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. या कविसंमेलनात ओमपाल सिंह निडर (फिरोजाबाद), मनोज मद्रासी (निजामाबाद), दयाशंकर तिवारी (नागपूर), प्रा.कपील जैन (यवतमाळ), लोकेश जडीया (धार), संचालन डॉ.निरज व्यास यांनी केले.

  या कवीसंमेलनात मान्यवर कविंनी राजकीय, सामाजिक, पर्यावरण आदी विषय़ांवर कविता सादर केल्या. वर्णभेदाच्या कवितेवरून मनोज मद्रासी यांनी रसिकांना खिळवून ठेवले. लोकेश जडीया यांच्या पर्यावरणावरील तसेच सामाजिक प्रबोधनात्मक दारूबंदीच्या कवितेंनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ओमप्रकाश निडर यांनी सांस्कृतिक समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणा-या हास्य व्यंग कविता सादर केल्या.

  प्रारंभी कवि संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. मान्यवरांचे स्वागत नगरसेवक संजय बंगाले आणि प्रभाग अध्यक्ष अमर पारधी यांनी केले. या कविसंमेलनाला मार्गदर्शन करताना माजी खासदार अजय संचेती म्हणाले, अटलजींच्या कविता या मनाचा वेध घेतात. अटलजींच्या कवितेमुळे एक नवीन ऊर्जा मिळते. अटलजींच्या कविता नेहमीच आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

  कार्यक्रमाला प्रा.श्रीकांत देशपांडे, सतीश डागूर, प्रा.बिज्जूभैय्या पांडे, शैलेंद्र वाजपेयी, संजय कश्यप प्रामुख्याने उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145