Published On : Sat, Apr 25th, 2020

ऑटो चालकांना आ. जैस्वाल व्दारे किराणा व खादय सामुग्रीची मदत

कन्हान : – रामटेक श्रेत्राचे आमदार आशिष जैस्वाल व्दारे कन्हान परिसराती ल १४० तीन चाकी ऑटो रिक्षा चालकां ना किराणा सामान व खादय सामुग्री किट चे वाटप करून मदत करण्यात आली.

कोरोना विषाणुच्या प्राद्रुभावामुळे लॉकडाऊनचे पालन करीत एक महिण्या पासुन घरी असलेल्या कन्हान परिसराती ल तीन चाकी ऑटो रिक्षा चालकांची आथिॅक परिस्थिती लक्षात घेत.

रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.आशिष जैस्वाल यांच्या वतीने कन्हान व परिसरा तील कांद्री, टेकाडी, कोळशा खदान, गोंडेगाव, खंडाळा, निलज, बोरी येथील १४० तीन चाकी ऑटो रिक्षा चालकांना किराना सामान, खादय सामुग्री असलेली किट वाटप करून मदत करण्यात आली .

ही मदत कन्हान नगराध्यक्षा करूणा ताई आष्टणकर, व त्यांच्या कार्यकर्त्यां च्या सहकायाने करण्यात आल्याने सर्व ऑटो चालकांच्या वतीने राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हानचे कार्याध्यक्ष बाळुभाऊ नागदेवे, सचिव गज्जुभाऊ बल्लारे यांनी आभार व्यकत केले.