Published On : Thu, Oct 17th, 2019

रमाई बचत गटाचे रंगबेरंगी सुरेख मेणाचे दिवे बाजारात

कन्हान : – ग्राम पंचायत वराडा अंतर्गत मौजा वाघोली येथील रमाई स्वयंम सहाय्यता महिला बचत गटाने मेणाचे रंगबेरंगी सुरेख दिवे बनवुन बाजारात मागणी असल्याने महिला गटातील महिला सक्षम बनत आहेत.

सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्राम पंचायत वराडाच्या वाघोली गावात स्थापन करण्यात आलेल्या रमाई स्वयंम सहाय्यता महिला बचत गटाने मेणाचे रंगबेरंगी सुरेख दिवे बनवुन बाजारात आणले आहेत. या दिव्याना बाजारात चांगलीच मागणी असल्याने गटातील महिला अध्यक्षा प्रतिभा अमित पौनिकर, सचिव आरती राजु मेश्राम सदस्या सविता खोब्रागडे, संगिता पौनिकर, ओजंता पाटील, संघमित्रा वासनिक, ललिता ऊईके, मिना काकडे, सिता भोंडे, इंदु गजभिये सक्षम बनत आहे.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या गटाकरिता ग्राम पंचायत सदस्य राकेश काकडे , इंदुबाई गजभिये , ग्रामप्रेरक रूपेश चरडे यांनी सहकार्य केले. सदर महिला गटाचे मेणाचे दिवे अतिशय सुरेख असुन नागरिकांनी खरेदी करून सहकार्य करावे असे आवाहन रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रतिभा अमित पौनिकर, सचिव आरती राजु मेश्राम हयानी केले आहे.

ग्राम पंचायत वराडा च्या सरपंचा विद्याताई चिखले, उपसरपंचा उषाताई हेटे, सर्व सदस्य, सदस्या व ग्राम सचिव निर्गुण शेळकी हयानी रमाई महिला बचत गटाच्या महिलांच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement