Published On : Tue, May 28th, 2019

बारावीच्या परीक्षेत कामठीतील एस के पोरवाल महाविद्यालयाचे सुयश

कामठी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प च्या वतीने 21 फेब्रुवारी ते मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज 28 मे ला आनलाईन पद्ध्तीने जाहीर करण्यात आला असून कामठी तालुक्याचा 81.20टक्के निकाल लागला त्यातील एस के पोरवाल महावोद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी प्राविण्यप्राप्त गुण घेऊन महाविद्यालयाचे नाव गौरणवीत केले.

यानुसार एस के पोरवाल महाविद्यालयाचा निकाल 77.97 टक्के लागला असून यातील प्रावीन्यप्राप्त गुणांची वारी बघितली असता विज्ञान शाखेतून आयुष सिंग राणे यांना 87.69 टक्के, अंकुश इंगळे 88.23 टक्के, रापल जैस्वाल 81.69टक्के गुणप्राप्त केले तर वाणिज्य शाखेतून करण नांनकाणी यांना 94.15टक्के, राशी अग्रवाल 94 टक्के, विधी नांनकानो 92.61 टक्के गुण प्राप्त झाले ,तसेच कला शाखेतील उजमा आमरीन मो इकबाल हिला 76.92टक्के, शिवाणी बोरकर 66.46टक्के, तसेच प्राची बागडे ला 64.15टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

– संदीप कांबळे