Published On : Fri, Aug 16th, 2019

कन्हान नदीत बुडून महाविद्यालयीन सुरक्षा रक्षकाचा मृत्यु

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भूषण नगर न्यू येरखेडा रहिवासी व मो अली बी एड महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या इसमाचा काल 15 ऑगस्ट ला कन्हान नदीत वाहून गेल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी 4 दरम्यान कन्हान नदीच्या तीरावर निदर्शनास आलो असून मृतक तरुणाचे नाव मदन संतोषराव खोडे वय 50 वर्षे रा भूषण नगर न्यू येरखेडा कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा कन्हान नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अम्मा चा दर्गा समोरील मार्गाहुन कन्हान कडील दिशेने एक इसम वाहून जात असल्याची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलिसांनी वेळीच मदतीची धाव घेत कर्तव्यदक्ष भूमिकेतून वाहून जात असलेला मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात यश मिळविले.

यावेळी कन्हान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील शासकोय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात मृतदेह हलविण्यात आले यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या मृत्यू प्रकरणातील गूढ रहस्य अजूनही कायम आहे तर हा मृतदेह कन्हान नदीत वाहून आला कसा हे अजूनही अनुत्तरित आहे.मृतकाच्या पाठीमागे पत्नी व एकुलती एक मुलगी आहे.

संदीप कांबळे कामठी