Published On : Fri, Aug 16th, 2019

स्वातंत्र दिन भव्य रक्तदान, नि:शुल्क आरोग्य शिबीराने थाटात साजरा

कन्हान : – भारतीय ७३ व्या स्वतंत्र दिना निमित्त विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे तारसा चौक कन्हान येथे भव्य रक्तदान व नि:शुक आरोग्य शिबीराच्या आयोजनाने थाटात साजरा करण्यात आला .

विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे दरवर्षी प्रमाणे तारसा रोड चौक कन्हान येथे गुरुवार दि १५ ऑगस्ट २०१९ ला १० ते २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान व नि:शुक आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीरात डॉ राहुल महाल्ले बालरोग व जनरल चिकित्सक, डॉ तमीम फाजील हुदय रोग, मधुमेह चिकित्सक, डॉ रिषीकेश राऊत अस्थी रोग तञ, डॉ राखी महल्ले स्त्री रोग व जनरल चिकित्सक तसेच रक्तदान शिबिर करिता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय रक्तपेढी नागपुर च्या डॉक्टर व चंमुनी सेवा प्रदान केली.

या भव्य रक्तदान व नि:शुक आरोग्य शिबीरास आमदार डी एम रेड्डी , श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष रंजितभाऊ सफेलकर, उपाध्यक्ष भाजपा नागपुर ग्रामीण डॉ राजेश ठाकरे, कन्हान थानेदार चंद्रकांत काळे, न प कन्हान उपाध्यक्ष मनोहर पाठक, अतुल हजारे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, नगरसेविका करूणाताई आष्टणकर, सुषमा चोपकर सह मान्यवर प्रामुख्याने झाले होते.

स्वातंत्र्य दिना निमित्ताने सचिव भाजपा नागपुर ग्रामीण जिवन मुंगले, चिंटु वाकुडकर, रजनिश (बाळा) मेश्राम, किशोर यादव, सुशील कळमकर राष्ट्रहित आॅटो युनियन कन्हानचे नरेंद्र पात्रे सह ४३ रक्त दात्यांनी रक्तदान केले आणि १७३ नागरिकांनी आरोग्य शिबिरा चा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आयोजक विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान चे शिवशंकर (चिंटु) वाकुडकर, मयुर माटे, रजनिश (बाळा) मेश्राम, भरत चकोले, आशिष वानखेडे, दिपक कुंभल कर, सिध्दार्थ टेर्भुणे, विजय खडसे, अशोक नारनवरे, सुनिल लक्षणे, सोनु मसराम, पंकज रामटेके, शैलेश ढोके, मृणाल सरोजकर, अमोल मेश्राम, लोकेश गि-हे, विक्की ऊके, अंकुश चकोले, नरेश मडावी, अनिल हटवार, राधेश्याम राऊत, राजेंद्र बचेरे, प्रितेश पैनिकर, अजय चकोले सह कार्यक र्त्यांनी सहकार्य केले.