Published On : Fri, Aug 16th, 2019

समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Advertisement

कामठी :- येथील सामाजकार्य महाविद्यालयात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन समारोह साजरा करण्यात आला. समारोहाच्या अध्यक्षस्थानी रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम होते,प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावचे माजी कुलगुरू व रायसोनी विद्यापीठ,मध्यप्रदेशचे विद्यमान कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम,तसेच महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.रमेश सोमकुवर मंचावर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.सुधीर मेश्राम म्हणाले, एकविसाव्या शतकात बौद्धिक संपत्ती सर्वश्रेष्ठ राहील त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करून संशोधन क्षेत्रांत देदीप्यमान कार्य करावे,असे आवाहन केले.

डॉ. पुरणचंद्र मेश्राम यानिमित्ताने मार्गदर्शन करताना म्हणाले,देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली परंतु आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मात्र अजूनही सर्वहारा जनतेपर्यंत पोहोचले नाही. समजकर्याच्या विद्यार्थ्यांनी देशाला आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी परिवर्तनाची चळवळ उभी करून गांधी-आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावा,असे आवाहन केले. याप्रसंगी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी विद्या येरणे, आदित्य बोरकर, हर्षिता नितनवरे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.रमेश सोमकुवर यांनी प्रास्ताविक केले, संचालन डॉ. सविता चिवंडे यानी केले तर प्रा.मनोज होले यांनी आभार मानले.कार्यक्रमाला डॉ.प्रणाली पाटील, प्रा.उज्जला सुखदेवे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, प्रा.ओमप्रकाश कश्यप ,प्रा. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, प्रा. मनीष मुडे, प्रा. हर्षल गजभिये, प्रा. राहुल जुनगरी,प्रा. राम बुटके,प्रा. गिरीश आत्राम प्रा.आवेसखर्नी शेख प्रमुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी