Published On : Wed, May 16th, 2018

महापौर आणि आयुक्तांच्या जनतेचे आभार : स्वच्छ सर्वेक्षण २०१८

Futala
नागपूर: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ चे पुरस्कार आज (ता. १६) नवी दिल्लीत जाहीर करण्यात आले. नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले आहे.

आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी ह्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र हे सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील एकूण नऊ शहरांना पुरस्कार मिळाले असून सहा राष्ट्रीय स्तरावरचे तर तीन विभागीय स्तरावरचे पुरस्कार आहेत. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पुरस्कारामध्ये नागपूर शहराचा समावेश आहे.

नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आणि तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात नागपूर शहराने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल यांनी शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण चमू कामाला लावली होती. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणा संदर्भात झोन निहाय बैठका घेऊन कृती आराखडा प्रत्यक्षात उत्तरविला. स्वच्छ सर्वेक्षणात कुठेही कमी राहु नये यासाठी म्हापैर नंदा जिचकार, तत्कालीन मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी आणि अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवकांनी वस्त्यावस्त्यामध्ये मध्ये दौरे करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. स्वच्छ्ता अम्बेसडरची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्वच्छ्ता सर्वेक्षणाची माहिती पोचविली.

लोकसहभागासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागपुरकरांनीही जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. लोकप्रतिनिधी, मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छ्ता दूत आदीच्या सामूहिक प्रयत्नातून नागपूर शहराने ही यशश्री खेचून आणली.

नागपूरकरांचे अभिनंदन : आयुक्त वीरेंद्र सिंह

स्वच्छता सर्वेक्षणात बाजी मारलयबद्दल नागपूरांसह सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. यापुढेही अशीच सामूहिक कामगिरी करून सर्व क्षेत्रात यश प्रप्त करू.

जनतेचे आभार : महापौर नंदा जिचकार

नागपूर शहराने स्वच्छ सर्वेक्षणात मारलेली मुसंडी हे सामूहिक प्रयत्नाचे फलित आहे. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानासोबतच जनतेने या सर्वेक्षणात जो भरभरून प्रतिसाद दिला, त्याबदल जनता आणि सर्वांचे महापौर या नात्याने मी आभार मानते आणि सर्व नागपूरकरांचे अभिनंदन करते.

सामूहिक प्रयत्नाचे यश : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

 

नागपूरने स्वच्छ्ता सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर मिळविलेले यश हे सामूहिक प्रयत्नाचे आणि प्रामाणिक कामगिरीचे फलित आहे. मनपातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगारांनी खरच प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. नागरिकांमध्ये जाण्यास नगरसेवकांनी सहकार्य केले. लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.

महापौर आणि आयुक्तांच्या नेतृत्वाने दिले यश : स्वच्छता अम्बेसडर कौस्तभ चैटर्जी

सन २०१७-१८ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणाला महापौर नंदा जिचकार आणि तत्कालीन आयुक्त अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वाने खऱ्या अर्थाने गती दिली. या दोघांच्याही काम करण्याच्या पद्धतीने अशिकारी, कर्मचारी आणि अभियानात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहन मिळाले. काम करण्याची ऊर्जा मिळाली आणि यामुळेच स्वच्छता सर्वेक्षण लोकांपर्यंत पोचले. या दोन्ही नेतृत्वाचे आणि सर्व संबंधितांचे मी अभिनंदन करतो.