Published On : Wed, Mar 3rd, 2021

डासांचा प्रकोप थांबविण्यासादर्भात युवक कांग्रेस चे सामूहिक निवेदन

कामठी :-कामठी शहरात दिवसेंदिवस डासांचा प्रकोप वाढीवर आहे ज्यामुळे नागरिकांना विविध रोगराईचा सामना करावा लागत आहे तेव्हा नागरिकांना सुविधा देण्याच्या हेतूने डासांचा प्रकोप थांबविण्यासाठी कामठी नगर परोषद च्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या या मागणीसाठी आज 3 मार्च ला मो. इरशाद शेख महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव मो इर्शाद शेख यांच्या आदेशानुसार व नागपुर जिला युवक काँग्रेस चे सचिव राशीद अन्सारी यांच्या नेतृत्वात कामठी नगर परिषद चे मुख्य अधिकारी ला युवक कांग्रेस च्या वतीने सामूहिक निवेदन देण्यात आले.

हे निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश सेवा दल सह सचिव राजकुमार गेडाम, कामठी शहर काँग्रेस अध्यक्ष कृष्णा यादव, नागपुर जिला महासचिव- सेवादल , सिराज भाटी ,,मो. सलमान , मो. सुलतान , इरफान अहमद, , साजीद अंसारी, दिवाकर राव, फरमान खान, जुबैर शरीफ, आजान खान, जफर शेख, सुलतान शेख, आदि काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस चे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्या त उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी