Published On : Wed, Oct 7th, 2020

मास्क न लावणा-या २२२ नागरिकांकडून दंड वसूली

Advertisement

आतापर्यंत १०५४७ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवार (६ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०५४७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ३६,३२,५००/- चा दंड वसूल केला आहे.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ६०, धरमपेठ झोन अंतर्गत ४०, हनुमाननगर झोन अंतर्गत १३, धंतोली झोन अंतर्गत १०, नेहरुनगर झोन अंतर्गत ७, गांधीबाग झोन अंतर्गत १५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २३, लकडगंज झोन अंतर्गत १५, आशीनगर झोन अंतर्गत २१, मंगळवारी झोन अंतर्गत १५ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ५०७७ बेजबाबदार नागरिकांकडून रु २५ लक्ष ३८ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून वचक करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नगारिकांना बचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.

Advertisement
Advertisement