नागपूर : राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध त्रुटींविरोधात कॉकरोज जनता पार्टीने नागपुरात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके १६ जून रोजी नागपुरात येणार असून या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे.
यापूर्वी दिल्ली आणि पुणे येथे आंदोलन केल्यानंतर आता पक्षाने उपराजधानी नागपूरची निवड केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विविध शैक्षणिक मुद्द्यांवर हे आंदोलन केंद्रित असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या आंदोलनाला अद्याप पोलिस प्रशासनाची अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नियोजित कार्यक्रम होणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून प्रस्तावाची पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आंदोलनाची वेळ, ठिकाण आणि इतर तपशील जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे १६ जूनच्या या प्रस्तावित आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





