Published On : Mon, Jul 1st, 2019

नासुप्र येथे वसंतराव नाईक यांची १०६वी जयंती साजरी

Advertisement

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची १०६ वी जयंती आज सोमवार, १ जुलै रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यास’च्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त व नासुप्र’चे सभापती श्रीमती श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नामप्राविप्र’चे अप्पर आयुक्त श्री. हेमंत पवार, अधीक्षक अभियंता (मुख्यालय) श्री सुनील गुज्जेलवार, नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री लांडे, नामप्रविप्रा’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री हेमंत ठाकरे, आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवदूत आणि जनसंपर्क व सचिव-१ श्रीमती कल्पना गीते तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.