Published On : Mon, Sep 2nd, 2019

सीएमआरएस करणार मेट्रोच्या अँक्वा लाईन ची पाहणी

नागपूर : हिंगणा मार्गावरील(रिच ३ – अँक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) आज मंगळावर, दिनांक ०२ सप्टेंबर रोजी नागपुर येणार आहे. तीन दिवसीय दौऱ्यावर ‘सीएमआरएस’ आयुक्त, मेट्रो रेल सुरक्षा श्री. जनक कुमार गर्ग हिंगणा मार्गावरील लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दम्यान चार मेट्रो स्टेशन, रोलिंग स्टॉक, डेपो, ट्रॅक व संबंधित उपकरणांसह इतर सुविधांचे परीक्षण करणार आहे.

नियोजित वेळेनुसार मंगळवारी सीएमआरएस आयुक्त श्री. जनक कुमार गर्ग हिंगणा डेपो येथे महा मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रकल्पांतर्गत झालेल्या कार्यावर चर्चा करणार आहे. यानंतर चीन येथून आलेल्या रोलिंग स्टॉक (मेट्रो कोच), डेपो मधील सुरक्षा उपकरणे, टेक्निकल रूम, रखरखावाचे दस्तावेज, आपत्कालीन निर्वासन सुविधा, यासह इतर सुविधांची पाहणी करेल.

Advertisement

प्रवासी सेवेच्या दृष्टीने श्री. जनक कुमार गर्ग दुपारी हिंगणा डेपो ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दरम्यान मोटर ट्रॉली’ने प्रवास करून मेट्रो ट्रॅक, बांधकाम, ओएचई, सिग्नलिंग अँड टेलिकॉम व इतर संबंधित घटकांचे परीक्षण करेल. यानंतर सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथे ट्रॅक सेंटर लाईन व भार क्षमता तसेच लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्लीअरन्स व इतर संबंधित घटकांची पाहणी करण्यात येणार आहे.

नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावर लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी महा मेट्रो पूर्णपणे सज्ज आहे. प्रवासी सेवेच्या दृष्टीने ट्रॅक, केबलिंग, सिग्नलिंग असे संपूर्ण कार्य या रिच’वर पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गावरील स्टेशनचे कार्य देखील पूर्णत्वास आले आहे

Advertisement
Advertisement
Advertisement