Published On : Sat, May 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भांडेवाडीत कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी

Advertisement

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरातील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती घेत उत्पादन प्रक्रिया, प्रकल्पाची क्षमता आणि भविष्यातील विस्तार योजनांचा आढावा घेतला.

या प्रकल्पाद्वारे शहरातील घनकचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करून त्यापासून सीएनजी गॅसची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या कमी होण्यास मदत होणार असून पर्यावरणपूरक आणि स्वच्छ इंधनही उपलब्ध होणार आहे.

पाहणीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे प्रभावी संचालन करण्यासह पर्यावरण संरक्षणाच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.

राज्यात स्वच्छता, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.