Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री ‘बुलेट’वरून विधानभवनात; PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला फडणवीसांचा कृतीतून प्रतिसाद

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या संदेशाला आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कृतीतून प्रतिसाद दिला आहे. नेहमीचा मोठा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्थेऐवजी मुख्यमंत्री आज चक्क ‘बुलेट’ मोटारसायकल चालवत विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवत होते, तर त्यांच्या मागील सीटवर भाजपचे मुंबई अध्यक्ष Ashish Shelar बसले होते. विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानावरून थेट बुलेटवरून विधानभवनात पोहोचले.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,63,000 /-
Gold 22 KT ₹ 1,51,600 /-
Silver/Kg ₹ 2,92,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री बुलेटवरून उतरताच आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची एकच झलक पाहण्यासाठी गर्दी केली. मुख्यमंत्र्यांच्या या साध्या आणि प्रतीकात्मक कृतीची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, जागतिक ऊर्जा संकट आणि वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरेही तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंधन आणि परकीय चलनाची बचत करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मंत्रालयातील अनेक बैठका आता प्रत्यक्षाऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे निर्देशही देण्यात आले, ज्यामुळे जिल्ह्यांमधून मुंबईत होणारा अनावश्यक प्रवास टाळता येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधेपणाचा संदेश प्रशासनासह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement