नागपूर : शहरात पुन्हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने चाॅकलेटचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नरेंद्र धनराज वाढरे (४५) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब आरोपीच्या शेजारीच भाड्याने राहतात. नरेंद्रने शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसल्याने संधी साधली. त्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला.
या सर्वप्रकराबाबत पीडित मुलीने आईला संगीतले. कुटुंबीयांनी तायाप्रकरणी वाठोडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.