– ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला आहे. या अपघातात आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० प्रवाशी जखमी झाले आहेत. कटक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल्समध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे.
कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांना धडकल्याने हा अपघात घडला.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मदतकार्यासाठी लष्कराला ही पाचारण करावे लागले.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीया भीषण रेल्वे अपघातानंतर एक दिवसाचा दुखवटा राज्यात जाहीर केला आहे.
कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांच्या मृत्यूची संख्या जास्त आहे.