Published On : Fri, Jul 5th, 2019

नगरपरिषद कन्हान अंतर्गत स्वच्छते चे तीन तेरा

Advertisement

कन्हान: नगरपरिषद कन्हान – पिपरी अंतर्गत पावसाच्या अगोदर नाल्याची व रस्त्याची योग्य साफसफाई करण्यात न आल्याने रस्त्यावरच नाल्याचे व पावसा चे पाणी साचुन नागरिकांना जाणे येण्या करिता भंयकर त्रास सहन करावा लागत असल्याने स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहे.

नगर परिषद कन्हान पिपरी अंतर्गत प्रभाग क्र.२ मधिल राम नगर, लोहिया लेआऊट पांधन रोड लगतची नाली मधिल दिड महिना पहिले कचरा , माती काढुन पांधन रस्त्यावर टाकण्यात आला. आता पावसाळा सुरू झाला तरी तो कचरा , माती उचलुन बाहेर नेऊन फेकण्यात आला नसल्याने पावसामुळे रस्त्यावर किचड होऊन ये-जा करण्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागत असुन तोच कचरा परत नाली मध्ये जावुन नाली भरून साडपाणी वाहण्यास अळथळा होऊन साडपाण्याची दुर्गंधी पसरून रोगराई चा फैलाव होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल. तिच नाली सफाई करिता मोठय़ा प्रमाणात खर्च होईल. यास्तव नगरपरिषद स्वच्छता विभागा व्दारे पाधन रोड नालीचा कचरा काढुन आणि रस्त्यावरील टाकलेला कचरा गाडीने लांब फेकण्यात यावा. तसेच या नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने जागोजागी तुटलेली आहे. यामुळे नाली बांधकाम करण्या-या कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करून नालीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.