Published On : Fri, Jul 5th, 2019

कामठी नगर परीषद विरोधी नगरसेवकांचे एक दिवसीय सांकेतिक उपोषण

कामठी ता प्र ४ जुलै-येथील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी

भारतीय जनता पार्टी,बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि शिवसेना च्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कार्या बाबत पक्षपात करीत असल्याचा आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी केला असून न प च्या विरोधात एक दिवसाचे सांकेतिक उपोषण आंदोलन आज गुरुवार 4 जुलाई 2019 को कामठी नगर परिषद समोर करण्यात आले

एक दिवसीय सांकेतिक उपोषण आंदोलनात विपक्ष नेता लालसिंग यादव,नगरसेवक संजय कनोजिया, धर्मपाल(छोटु)मानवटकर,
प्रतिक पडोळे,पिंकी वैद्य, संध्या रायबोले, स्नेहलता गजभिये,हर्षा यादव आणि बरिएएम चे शहराध्यक्ष दीपांकर गणवीर भाजयुमो चे तहसील अध्यक्ष कपिल गायधने उपस्थित होते

नगराध्यक्ष जनतेतुन निवडून आले असून त्यांना सर्वाधिकार असल्याने न प मधे मनमानी सुरु असल्याचा आरोप लालसिंग यादव यांनी केला पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुले यांनी कोटयावधी रूपयांचा निधि उपलब्ध करून दिला असलातरी नियोजन शून्य काम होत आहे विकास कामांचा दर्जा सुमार आहे मोठ्या प्रमाणात भष्टाचार होत आहे

विरोधी गटाच्या नगरसेवकां च्या प्रभागात विकास कार्या बाबत पक्षपात होत असून त्याचे विषय न प च्या सभेत घेण्यात येत नाही घेतल्यास निधि उपलब्ध नसल्याचे सांगून बोळवन केली जाते

सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांच्या प्रभागतील विकास कामा बाबत चौकशी करण्यात यावी याबाबत श्वेत पत्रिका काढण्यात यावी अशी मागणी लालसिंग यादव यांनी पालकमंत्री बावनकुले यांना केली आहे याबाबत चे निवेदन उपविभागीय अधिकारी वंदना सवरगपते यांना देण्यात आले

– संदीप कांबळे कामठी