Published On : Mon, Sep 25th, 2017

‘स्वच्छता हीच सेवा’ राजभवन येथे स्वच्छता अभियान

मुंबई : ‘स्वच्छता ही च सेवा’ या अभियानांतर्गत राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज राजभवन परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. तसेच राजभवन मधील देवीमंदीराजवळ वृक्षारोपण केले.

या स्वच्छता मोहिमेत राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी,उपसचिव रणजीत कुमार, परिवार प्रबंधक वसंत साळुंके, राजभवन मधील अधिकारी,कर्मचारी त्यांचे कुटुंबिय, राज्य राखीव पोलीस दल, मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

राजभवनचा परिसर सुंदर व स्वच्छ ठेवत असल्याबद्दल तसेच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल राज्यपालांनी यावेळी सर्वांचे कौतुक केले.