कामठी: शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आज ता 25 सप्टेंबर ला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराज पुतळ्याला हार अर्पण करून शहराच्या विविध मार्गाने भ्रमण जरून मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला
रामटेक लोकसभा क्षेत्राचे खा.कृपाल तूमाने यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवर,उपजिल्हाप्रमुख राधेश्याम हटवार ,तालुका प्रमुख वासू भोयर, शहर प्रमुख मुकेश यादव यांच्या नेतृत्वात तहसीलदार बाळासाहेब टेळे यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात सांगितले की राज्यामध्ये सतत वाढत असलेली महागाई पेट्रोल, डिझेल चे भाव तसेच नागपूर जिल्ह्यात सुरू असलेले वीज भारनियमन यावर त्वरित उपाययोजना वाढती महागाईमुळे जिल्ह्यातील सामान्य जनता अगोदरच त्रस्त झालेली असून त्यामध्ये भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिकांच्या संकटात वाढ झालेली आहे याचा फटका जनता व शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून यावर शासनाने त्वरित तोडगा काढावा अन्यथा शिवसेना सामान्य जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून केला आहे
निवेदन देतेवेळी नगरसेवक राजू पोलकमवार, वीराग जोशी, शुभम नवले, देवेश ठाकरे,कमलेश राऊत,वासू मंगतानी,श्रीराम हटवार,प्रदीप भोकरे,सुरज इत्यादिसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती