Published On : Wed, Mar 21st, 2018

सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Advertisement


नागपूर: कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्या, या मागणीसाठी सफाई कामगारांनी अडीच तास कामबंद आंदोलन केले. बुधवारी सकाळी ६ ते ८.३० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर हे आंदोलन करण्यात आले. कामगारांची समजुत घातल्यानंतर कामगार पुन्हा कामाला लागले.

मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाची स्वच्छता करणाºया सफाई कामगारांना मागील अडीच महिण्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे उपाशापोटी राहून रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. जुन्या कंत्राटदाराने दिड महिण्याचे तर नव्या कंत्राटदाराने चालु महिण्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी अडचनीत आले आहेत. दरम्यान सफाई कामगारांना पुढील आठवड्यात त्यांचे रखडलेले वेतन देण्यात येईल, ही रक्कम संंबधीत कंत्राटदाराच्या अनामत रकमेमधून वसूल करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाºयाने आश्वासन दिले आहे.

वेतन मागण्यासाठी ज्या कामगारांनी पुढाकार घेतला, त्या तीन कामगारांना कमी करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळच्या शिफ्ट मधील सफाई कामगार एकत्रित आले. त्या तिन्ही कामगारांना कामावर घ्या अशी एकच मागणी त्यांनी लावून धरली. दरम्यान अडीच तास पर्यंत काम बंद होते. कंत्राटदारांनी नियुक्त केलेल्यांनी मध्यस्थी केल्यामुळे ८.३० नंतर कामगार पुन्हा कामाला लागले. आपल्या मेहनतीचा आणि हक्काचा पैसा मागणे गुन्हा आहे का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. अशीच स्थिती राहील्यास पुढे स्थानकावर मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.