Published On : Tue, Aug 18th, 2020

कळमना जलकुंभाची स्वच्छता २० ऑगस्ट रोजी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांनी गुरुवार, ऑगस्ट २०, २०२० रोजी कळमना जलकुंभ स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कामादरम्यान, गुरुवार, ऑगस्ट २०, २०२० रोजी खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील: पुंजाराम वाडी, वैरागडे वाडी, साखरकर वाडी, संजय नगर, डीपटी सिग्नल, बाजार चौक परिसर, कुंभार पुरा, गोपाल नगर, आदिवासी प्रकाश नगर, चिखली देवस्थान , म्हाडा कॉलोनी, चिखली बस्ती, स्माल factory area..

येथे उल्लेखनीय आहे कि, मनपा-OCWने ही तांत्रिकदृष्ट्या आधुनिक अशी ही जलकुंभ स्वच्छता मोहीम शहराभरात सुरु केली. याद्वारे OCWने सर्व ESRs(Elevated Service Reservoir) च नव्हे तर GSR (Ground Service Reservoir), MBR (Master Balancing Reservoir) आणि सम्पदेखील स्वच्छ केले आहेत. नियमित व ठराविक वेळापत्रकानुसार चालणाऱ्या जलकुंभ स्वच्छतेच्या कामांमुळे पाण्याची गुणवत्ता खात्रीशीरपणे राखली जाते.

दुषित पाणी हे मानवजातीला होणाऱ्या रोगांचे सगळ्यात मोठे कारण आहे. माणसाला होणारे बहुतांश आजार हे जलजन्य असतात व पाणी दुषित होण्याचे नेहमीचे कारण म्हणजे जलकुंभ-ज्यांची स्वच्छता पूर्वी दुर्लक्षिली जाई वा अशास्त्रीय पद्धतीने केली जाई.

मात्र या सर्व गोष्टी आता भूतकाळात जमा झाल्या आहेत. मनपा व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जलकुंभ स्वच्छ करण्यासाठी सुरक्षित व शास्त्रीय पद्धत अमलात आणली आहे. तीन वर्षांपूर्वी मनपा-OCWने ही पद्धत सुरु केली व प्रत्येक जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छ करण्याचा संकल्प केला.

नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनपा-OCW दिलगीर आहे.

For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899