– प्रदीपचंद्रन यांनी सोपविला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार
भंडारा – नवीन जिल्हाधिकारी संदीप कदम आज रुजू झाले असून त्यांनी एम. जे. प्रदीपचंद्रन यांच्याकडून भंडारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भवनेश्वरी एस., सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे उपस्थित होते.
संदीप कदम मुळचे नाशिकचे असून हिमाचल कॅडरचे 2008 च्या बॅचचे आयएएस आहेत. आयआयटीमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले कदम यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी, हेरीमपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे.
भंडारा येण्यापूर्वी ते राज्य सीईटी सेलचे आयुक्त आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव होते. हिमाचल प्रदेश येथे असतांना बेटी बचाव व स्वच्छता अभियानात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हिमाचलच्या धर्मशाळेला स्मार्ट सिटी बनविण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती.