Published On : Tue, Aug 8th, 2017

अवैधरीत्या नळ कनेक्शन जोडणाऱ्या ग्राहकांवर होणार गुन्हे दाखल

Advertisement

नागपूर: सवलतीची योजना जाहीर करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांच्या चल मालमत्तेवर टाच येणार आहे. ११ ऑगस्टपासून कार, मोटारसायकल, टीव्ही, फ्रीज, सोफा आदी चल संपत्ती आणि त्यानंतर कायद्यानुसार अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. इतकेच नव्हे तर नळ कनेक्शन कापलेल्या थकबाकीदारांनी पुन्हा ते जोडले असेल अशा थकबाकीदारांवर पुढील तीन दिवसांत गुन्हे नोंदविण्यात यावे, असे आदेशही त्यांनी झोनल अधिकारी आणि ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांना दिले.

थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी नागपूर महानगरपालिकेने १७ जुलै ते १० ऑगस्ट या काळात ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. प्रारंभी या योजनेचा कालावधी ७ ऑगस्टपर्यंत होता. यानंतर योजनेला तीन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान योजनेतील कालावधीत झोननिहाय वसुलीचे उद्दिष्ट काय होते, किती टक्के वसुली करण्यात आली, कमी वसुलीची कारणे काय आणि कुठल्या कर्मचाऱ्यांनी योजनाकाळात कर्तव्यात हलगर्जीपणा केला, यासंदर्भात मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बैठकीला महापौर नंदा जिचकार, सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेविका दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. रिजवान सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, ओसीडब्ल्यूचे राहुल कुळकर्णी उपस्थित होते.
सदर बैठकीत महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी अभय योजनेअंतर्गत मागील २० दिवसांत करण्यात आलेल्या करवसुलीचा झोननिहाय आढावा घेतला. ज्या थकबाकीदारांनी योजनेत सहभागी न होता अजूनही थकबाकी ठेवली आहे अशा थकबाकीदारांवर सर्व प्रकारची कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर आणि आयुक्तांनी दिले. अभय योजनेदरम्यान कर्तव्यात कुचराई करणाऱ्या कर निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांची यादी तातडीने सर्व सहायक आयुक्तांनी आयुक्तांकडे सोपवावी. त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर निलंबनाची आणि वेतनवाढ थांबविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, आर. पी. भिवगडे, जी. एम. राठोड, राजेश कराडे, अशोक पाटील, पी. एल. वऱ्हाडे, सुभाष जयदेव, विजय हुमने, हरिश राऊत, झोनचे जलप्रदायचे डेलिगेट उपस्थित होते.

धनादेश अनादरप्रकरणीही होणार कारवाई

मालमत्ता योजनेअंतर्गत कर रक्कम चुकविण्यासाठी दिलेल्या धनादेशापैकी ज्या ग्राहकांचे धनादेश अनादरित झाले त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

अवैधरीत्या नळ कनेक्शन जोडणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

मागील अभय योजनेत ज्या ग्राहकांनी पाणी कराची रक्कम भरली नाही, अशा ग्राहकांचे नळ कनेक्शन ओसीडब्ल्यूने कापले होते. मात्र, हे कापलेले कनेक्शन ग्राहकांनी अवैधरीत्या जोडले. अशा ग्राहकांची यादी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी महापौर आणि आयुक्तांपुढे सादर केली. या ग्राहकांवर तातडीने मनपाचे डेलिगेट आणि ओसीडब्ल्यूच्या झोनल अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे एफआयआर दाखल करण्याचे आदेश महापौर आणि आयुक्तांनी दिले.

११ पासून सुरू होणार नळजोडणी कापण्याची मोहीम

१० ऑगस्ट रोजी ‘अभय योजने’चा अखेरचा दिवस आहे. योजना संपेपर्यंतही थकीत पाणी कर न भरणाऱ्या ग्राहकांचे नळ कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश यावेळी आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement