Published On : Sat, Oct 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिल्लीतील आंदोलनापूर्वी धरपकड; सीजेपी कार्यकर्त्यांसह कंटेंट क्रिएटर्स ताब्यात,दिपके दिल्लीत पोहोचणार

Advertisement

दिल्लीतील आंदोलनापूर्वी धरपकड; सीजेपी कार्यकर्त्यांसह कंटेंट क्रिएटर्स ताब्यात,दिपके दिल्लीत पोहोचणार

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने आज, १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मात्र, आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, सीजेपीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह अनेक कंटेंट क्रिएटर्सनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अभिजीत दिपके लवकरच दिल्लीत पोहोचणार आहेत.

आंदोलकांना जंतर-मंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शुक्रवारी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेमधून सीजेपी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मध्य दिल्लीतील मोबाइल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २३ हजार केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान आणि दिल्ली पोलिसांचे ५ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून यापूर्वीही विरोधकांनी आंदोलन केले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जंतर-मंतर, आकाशवाणी भवन आणि निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते. आता सीजेपीच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.