
मुंबई -सीजेपीच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नीट पेपरफुटीच्या विरोधात सीजेपीच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांनी पाठिंबा दिला होता. काही ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, सीजेपीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर विविध राज्यांत कारवाई सुरू असल्याचा आरोप केला होता. तसेच कारवाई थांबवली नाही, तर पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला होता.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने भूमिका स्पष्ट करत आंदोलनाच्या काळात विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य पोलिसांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलने झाली होती. या निर्णयानंतर संबंधित विद्यार्थ्यांवरील प्रकरणे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...




