Published On : Wed, Aug 12th, 2020

नगर परिषद च्या जेसीबी ने तोडली पक्की नाली

– पुन्हा बनवून द्या महिलांचे आ सावरकर यांना निवेदन

कामठी: – स्थानिक रामगढ क्षेत्रा तील आनंद नगर भागात ६ जुलैला आलेल्या मुसळधार पावसामुळे नाली जाम झाली होती ही नाली तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या निर्देशा ने नगर परिषद च्या जेसीबी चालकाने जेसीबी क्रमांक एम एच 49 सिए 0449 ने जवळपास १०० मिटर पक्की नाली तोडण्यात आली आता सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने व पावसाचे पाणी जमा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो,डास वाढले असून डेंग्यू मलेरिया ची साथ पसरू शकते याबाबत नगर परिषद ला 3 वेळा लिखित तक्रार दिली पण काहीही कारवाई करण्यात आली नाही तेंव्हा येथील त्रस्त महिलांनी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या नेतृत्वात आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन देऊन नगर परिषद ने तोडलेली नाली पूर्ववत बनविण्याची मागणी केली,

यावेळी भाजपा पदाधिकारी अनिल निधान,संजय कनोजिया, लालसिंग यादव उपस्थित होते निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात लिला रामटेके, भारती मेश्राम, सुवर्णा सहारे,जया मेश्राम,क्रांती मेश्राम, रत्ना चवरे, राधेलाल सोनानी, जाणीव बोंबले, भिमराव भोवते,रोहिदास लांजेवार,प्रज्वल सोलंकी,मेहरूम बी,नूर मोहम्मद, निसार खान,कासिम खान यांचा समावेश होता