Published On : Wed, Aug 12th, 2020

कामठीच्या सराफा व्यापाराची केली 71 हजार 810 रुपयांनी फसवणूक

Advertisement

कामठी2:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील सोनार ओळीतील अभिषेक ज्वेलर्स तसेच तिरुपती ज्वेलर्स च्या मालकास कामठी येथील गरुड चौक रहिवासी डॉक्टर महाजंनने 71 हजार 810 रुपयांने फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून यासंदर्भात पीडित सराफा व्यापाऱ्यांनी स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादवी कलम 420, 406 अनव्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी चे नाव डॉक्टर आशुतोष महाजन वय 40 वर्षे रा रचना अपार्टमेंट गरूड चौक कामठी असे आहे. आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे.

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष रामरतन भारूका यांच्या मालकीची सोनार ओळी कामठी येथे अभिषेक ज्वेलर्स (नोव्हेलटी) नावाचे सोने चांदीचे दुकान असून फिर्यादी व त्यांचे भाऊ निरंजन भारुका हे ज्वेलर्स च्या दुकानात उभे असताना आरोपी डॉ आशुतोष महाजन वय 35 राहणार रचना अपार्टमेंट गरुड चौक कामठी यांनी दि 23 डिसेंबर 2019 ला दुकानात येवून त्यांना सायंकाळी सगाईचा कार्यक्रम आहे असे सांगून त्यांच्यापासून 22 हजार 515 रुपये किमतीचा 5.580 मिली ग्राम ची सोन्याची चैन विकत घेतली व नगदी पैसे देण्याऐवजी आरोपी च्या एचडीएफसी बँकेच्या खात्यात रक्कम नसूनही आशुतोष अशोक महाजन नावाचा एचडीएफसी बँकेचा खाते क्र 50100300491620 चा चेक क्र 000054 असा 22, 515 रुपये चा चेक सेल्फ असे लिहून चेक दिला तसेच फिर्यादी यांचे भाऊ निरंजन भारुका यांचे तिरुपती ज्वेलर्स चे दुकानात जाऊन त्यांच्यापासून 11.980 मी ली ग्राम चा 49 हजार 295 रुपये किमतीचा गोप विकत घेऊन त्यांना एचडीएफसी बँकेची एनईएफटी ची स्लिप ज्या स्लीपवर निरंजन भारुका यांचे बँकेचा खाता क्र 01001110001994 रुपये 49, 295/-असे लिहिलेली पावती दिली याप्रकारे उपरोक्त आरोपी याने एचडीएफसी बँक कामठी शाखेचा धनादेश व डिजिटल व्यवहार करून दोन स्वर्णकाराची फसवणूक केली .

डॉ आशुतोष महाजन यांच्या बँक खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश वटला नाही संतोष भारुका यांनी अनेकदा आरोपी डॉ आशुतोष महाजन बरोबर मोबाईल वर संपर्क केला परंतु संपर्क झाला नाही त त्यामुळे भारुका यांना आपण फसल्या गेल्या ची खात्री होताच संतोष भारुका यांनी आरोपी विरोधात जुनी कामठी पोलीस स्टेशनला तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी जुनी कामठी पोलीस स्टेशनला कलम 420,406 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंजाब भानुसे करीत आहेत तसेच आरोपी अजूनही अटकेबाहेर असून या आरोपी विरुद्ध अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील नागपूर च्या सक्करदरा, आजनी, कोतवाली तसेच तहसील पोलीस स्टेशन सह यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशन ला सुद्धा गुन्हा दाखल असल्याची माहिती जुनी कामठी पोलिसांनी दिली असून आरोपी चा शोध सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी