Published On : Sun, Aug 16th, 2020

कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता नागरिकांनी सार्वजनिक पोळा उत्सव , गणेश उत्सव घरच्या घरी साजरे करावे-तहसीलदार बाळासाहेब मस्के

नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई- पोलीस निरीक्षक दिलिप ठाकूर

सध्या सर्वत्र कोरूना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव रामटेक शहरात व तालुक्यात वाढतच चालला आहे.
अश्यात नागरिकांनी मास्क वापरणे , हात सॅनिटायझर करणे, सोशल डिस्टन्स ठेवणे आता गरजेचे झाले आहे.

तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी नागरिकांना आव्हान केले की येणारे सण म्हणजे पोळा तसेच गणेशुत्सव सण यावर्षी घरच्या घरी करावे, गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता नागरिकांनी सार्वजनिक पोळा उत्सव , गणेश उत्सव घरच्या घरी साजरे करावे.

पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केले की सार्वजनिक कोणतेही सण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कारण आता सद्ध्या कोरोनाचे संकट असल्याने सद्ध्या रामटेक तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.

त्यामुळे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स इन ठेवणे आता खूप गरजेचे झाले आहे बाहेर दिसला तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
यावर्षी सर्व सण सार्वजनिक न करता आपल्या घरीच करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सर्व नागरिकांना आव्हाहन केले.