Published On : Sun, Aug 16th, 2020

सीलबंद बाटलीतून दारु काढून पाणी मिसळणाऱ्या टोळी वर कारवाई

Advertisement

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिलबंद बाटलीतुन दारु काढून पाणी मिसळणाऱ्या तीन व्यक्ती सह 2 लाख 83 हजार 630 किमतीची विदेशी दारु व टाटा एस वाहन असा रुपये 5 लाख 33 हजार 630 किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

होलसेल मद्य विक्रेत्यांकडून वाहतूक परवाना व मद्य घेऊन वितरणासाठी जातांना वाटेत विदेशी दारुचे टोपण काढून त्यातून दारु काढून तेवढे पाणी मिसळून परत टोपण बेमालूम पणे बसविणाऱ्या टोळीस ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाई मध्ये (1) विदेशी दारुच्या 180 मिलीच्या 1440 बाटल्या, (2) विदेशी दारुच्या 750 मिलीच्या 60 बाटल्या,(3) एक लिटर क्षमतेच्या विदेशी दारुने भरलेल्या 12 बाटल्या, (4) दारु भरण्यासाठी ची दोन नाळकी, (5) टाटा एस MH 40 AK 214 चार चाकी वाहन इत्यादी प्रमाणे दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टाटा एस वाहन क्रमांक — तसेच बनावट दारु बनविणारे (1) आकाश बाळू मेश्राम, (2) सिद्धू कांता साहू, (3) भूषण राजू लोणारकर (4) विकी प्रदीप इरणकर यांचे वर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाणी मिश्रीत दारु वितरण करण्यात आली होती ती ही जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. या कारवाई मध्ये व तपासकामात सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे, महिला जवान सोनाली खांडेकर, जवान नि वाहन चालक रवी निकाळजे व राजू काष्टे यांनी सहभाग घेतला.