नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृती साठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
यातच बुलडाणा लोकसभा मतदार संघातील तीन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. मोताळा तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या मोहेगाव, खडकी, खैरखेड अशी ही तीन गावांची नावे आहेत.
गावकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ग्रामस्थांनी ठरवले.तिन्ही गावात ठिकठिकाणी “मतदानावर बहिष्कार” अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले.
तसेच यामध्ये वन जमिनीवरील अतिक्रमण काढणे, स्थानिक नागरिक नसताना मतदार यादीत अतिक्रमण धारकांचा समावेश करणे अशी कारणे नमूद केली.या मागण्यांची पूर्तता न झाल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे.