नागपूर : शहरातील बेसा परिसरात ११ वर्षीय मुलीवर मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या पीएसआयला निलंबित करण्यात आले.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतला. राठोड असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी याप्रकरणी महिला आरोपीला बेंगळुरू येथून अटक केली आहे. सध्या आरोपीवर बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस लवकरच आरोपी महिलेला नागपुरात आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरी येथील एका घरात गेल्या महिन्यात मुलीला डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. मुलीला मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने सांगितले की, मुख्य आरोपी अरमान इस्तियाक खान आणि त्याचा मेहुणा मुलीवर अत्याचार करत होता.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अरमान, त्याची पत्नी हिना आणि मेहुणा अझहर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.