नागपूर : जिल्ह्यात बालमजुरीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत प्रशासनाने मोठी कारवाई करत वाडी परिसरातील एका लॉजिस्टिक कंपनीतून तब्बल १८ बालकामगारांची सुटका केली. ट्रकवर माल चढविणे आणि उतरविण्याच्या धोकादायक कामासाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे उघड झाल्याने प्रशासनाने संबंधित आस्थापनाविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग, शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नीता लॉजिस्टिक येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान अनेक अल्पवयीन मुले काम करताना आढळून आली. पथकाने तातडीने सर्व मुलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून, ही मुले विविध भागांतून आणण्यात आली होती. त्यांच्याकडून ट्रकवर माल चढविणे-उतरण्याचे कष्टाचे काम करून घेतले जात होते. बालकांच्या शिक्षणाचा आणि बालपणाचा हक्क हिरावून घेत त्यांच्याकडून मजुरी करून घेतली जात असल्याचे चित्र या कारवाईतून समोर आले आहे.
सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बालगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या समुपदेशनासह शैक्षणिक पुनर्वसन आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी संबंधित आस्थापनाविरुद्ध बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ तसेच सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रशासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, कुठेही बालकामगार आढळल्यास तत्काळ प्रशासन किंवा चाईल्ड हेल्पलाइनला माहिती द्यावी. बालमजुरीमुक्त आणि बालस्नेही समाज घडविण्यासाठी नागरिकांच्या सहभागाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे आणि सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, शिक्षण विभाग, कामगार विभाग, पोलीस विभाग, चाईल्ड हेल्पलाइन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





