Published On : Sun, Sep 8th, 2019

‘तरुण भारत’च्या ‘झेप महाराष्ट्राच्या विकासाची’ विशेषांकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर : ‘दैनिक तरुण भारत’च्या वतीने महाराष्ट्राच्या विकासाच्या मागील पाच वर्षातील विविध विकास कामांचा आढावा घेणारे ‘झेप महाराष्ट्राच्या विकासाची’ विशेषांकाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामगिरी येथे प्रकाशन करण्यात आले.

‘झेप महाराष्ट्राच्या विकासाची’ विशेषांकामध्ये शेती व संलग्न क्षेत्रासाठी मागील पाच वर्षातील गुंतवणूक, कमी पावसातही जलसंधारणाच्या कामांमुळे पिकांच्या उत्पन्नात झालेली वाढ, प्रधानमंत्री पीक विमा योजना तसेच कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, मेट्रो स्मार्ट सिटी, अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, राज्यातील शेतकरी डीजीटल प्लॅटफॉर्मवर आदी यशगाथांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

यावेळी तरुण भारतचे महाव्यवस्थापक मनोज मुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पहाडे, प्रतिनिधी महेंद्र बांगरे, ओम ढाकुलकर उपस्थित होते.