Published On : Sun, Sep 8th, 2019

रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर: अश्वमेध ग्रामीण विकास सामाजिक संस्था (AGVSS) तसेच डीएक्ससी तंत्रज्ञान यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी मिशन’ या सुसज्ज रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामगिरी येथे लोकार्पण करण्यात आले.

अश्वमेध ग्रामीण विकास सामाजिक संस्था (AGVSS) तसेच डीएक्ससी तंत्रज्ञान यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी मिशन’ ही सुसज्ज रुग्णवाहिका ग्रामीण भागामध्ये कार्यरत राहणार आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी, काटोल, कामठी तसेच नागपूर ग्रामीण परिक्षेत्रात ही रुग्णवाहिका सेवा देणार आहे. रुग्णवाहिकेमध्ये कॅन्सर डिटेक्शन मशीन, ईसीजी, पल्मनरी, बोन डेन्सिटी आदी आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. सीएसआर फंडातंर्गत ही रुग्णवाहिका ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

यावेळी अश्वमेध ग्रामीण विकास सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक राजेश साबू, अध्यक्ष यशवंत पांडे आदी उपस्थित होते.